जळगाव प्रतिनिधी । शहरात अवैध रित्या वाळू व मूरूमची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मंगळवार रोजी महसूल विभाग आणि जळगाव तहसील कार्यालयाच्या वतीने कारवाई करत तीन वाळूचे ट्रॅक्टर आणि दोन मूरूमच्या वाहनांवर कारवाई करत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभाग आणि जळगाव तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील नागझिरी येथे आज सकाळी तीन ट्रॅक्टरांवर दंडात्मक कारवाई करत ट्रॅक्टर क्रमांक एमएच 19 बीजी 2792, ट्रक्टर चेसीस क्रमांक (mbnac53ackca9993) आणि विना क्रमांकाचे तिसरे ट्रॅक्टर असे एकुण तीन वाहनांवर जिल्हाधिकारी कार्यालयात जप्त करण्यात आले आहे.
तर आज दुपारी 1 वाजता विनापरवाना मुरूम घेवून जाणारा डंपर क्रमांक (एमएच 19 सीडब्ल्यू 4940) आणि एक विना नंबरचे ट्रॅक्टर पकडण्यात आले. दोन्ही वाहने जिल्हा पेठ पोलीस स्थानकात जप्त करण्यात आले आहे. सदरील कारवाई जळगाव मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, ममुराबाद तलाठी सुधाकर पाटील, जळगाव तलाठी रमेश वंजारी, मेहरूण तलाठी सचिन माठी यांनी ही कारवाई केली आहे.