रावेर प्रतिनिधी । शहरात कमर्शियल मॉलच्या बांधकामासाठी टोले-जंग तसेच अवैध वाळूचा वापर करण्यात येत आहे. मालकाने कमर्शियल मॉल संदर्भात कोणतीही परवानगी न घेता कामास सूरुवात केली आहे.
या संदर्भात माहिती अशी की, रावेर शहरातील स्टेशन रोडने मोठे बांधकामाचे काम सुरु केले आहे. कमर्शियल मॉलचा मालक भुसावळ येथील रहिवासी आहे. मॉल मालक कपड्यांच्या व्यापार करण्यासाठी रावेर शहरात येत असतो. मागील सहा महिन्यांपासून स्टेशन रोडने टोले-जंग मॉलच्या निर्मितीसाठी बांधकाम सुरु आहे. यासाठी हजारो ब्रॉस वाळुची अवैध पध्दतीने परवानगी न घेता सर्रास वाळुचा वापर करीत आहे. येथील व्यापाऱ्याची मुजुरी इतकी वाढलेली आहे की, भुसावळ येथून खाजगी ट्रॅक्टर ट्रॉली रावेर तालुक्यात आणली जात आहे. वाळु वाहतूकसाठी हा व्यापारी शक्यतो रात्रीची वेळ साधत असतो. यावर महसूल प्रशासनाने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.