शेगाव रेल्वे स्थानकावर स्वयंचलित सिग्नल कार्यान्वित

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सतत व्यस्त असणाऱ्या रेल्वे स्टेशन दरम्यान अद्यावत स्वचलित सिग्नल प्रणाली राबवली जाते. पण आता संतनगरी शेगाव येथे देखील अद्यावत स्वचलित सिग्नल प्रणाली स्थापन करण्यात आली आहे.

शेगाव येथील रेल्वेस्थानकावर 10 ऑगस्ट रोजी डिप्टी सिग्नल पर्यवेक्षक कक्षात नवीन अद्ययावत स्वचलीत सिग्नल प्रणाली स्थापन करण्यात आली आहे. या प्रणाली मुळे येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांना स्थानकाबाहेर सिग्नल करिता थांबावे लागणार नाही. त्यामुळे गाड्या वेळेत धावतील व प्रवाशांना पण गाडी केव्हा येणार यासाठी जास्त वेळ रेल्वेस्थानकावर ताटकळत राहावे लागणार नाही.

ही प्रणाली स्थापन करते वेळी स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे, परिवहन निरिक्षक पी एम पुंडकर, सहा. परिचालन प्रबंधक महेश प्रसाद, संचलन निरिक्षक किशोर शास्त्री तथा इतर रेल कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content