नवी दिल्ली वृत्तसंस्था । अनेक देश करोनावरील लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियाने तर लस विकसित केल्याचाही दावा केला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने लस उपलब्ध झाल्यानंतर देशवासियांना मोफत डोस दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियाने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत करोना लस विकसित करणाऱ्या AstraZeneca या औषध कंपनीसोबत करार केला आहे. “दर करोना लस यशस्वी झाली तर आम्ही त्याची निर्मिती करुन आणि पुरवठाही सुरु करु. ऑस्ट्रेलियातील २५ कोटी नागरिकांना ती मोफत उपलब्ध असेल,” असं पतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियात आतापर्यंत २३ हजार लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर ४३० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारताने करोना लस विकसित करणाऱ्या तीन कंपन्यांना लस उपलब्ध झाल्यास कोणत्या किंमतीत ती उपलब्ध करु शकतो यासंबंधी विचारणा केली आहे. भारतातील लस सध्या मानवी चाचणी टप्प्यात आहेत.