सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | 17 ऑगस्टला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करूयात, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना यशस्वी केल्याबद्दल महिलांचे आभार व्यक्त केले. स्वागत करता येत नसेल तर विरोध तरी करू नका, असे म्हणत आपल्या विरोधकांना साताऱ्यातील फेमस कंदीपेढे नक्की पाठवा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण दीड हजार रुपयांनी सुरू केली आहे. महाराष्ट्र हे बलवान राज्य आहे. देशाचा ग्रोथ इंजिन महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि प्रकल्प सुरू आहेत. हे राज्य देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे राज्य आहे. जशी जशी सरकारची ताकद वाढेल तस तसे या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे वाढवणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आधी पावनेदोन हाजर, नंतर दोन हजार होतील, नंतर अडीच हजार होतील, 3000 होती किंवा 3000 पेक्षा जास्त देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे.
महिलांना केवळ दीड हजार रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. महिला बचत गट असेल, महिला समृद्धी योजना असेल, महिला बालकल्यांच्या योजना असतील, कौशल्य विकासाच्या योजना असतील, या योजनांच्या माध्यमातून देखील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला कर्ज घेतात, त्या शंभर टक्के पैशाची परतफेड करतात, असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. म्हणूनच उद्योगाच्या माध्यमातून महिलांना ताकद त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.