Home Cities जळगाव थकीत कराचा भरणा न केलेल्या वाहनांचा लिलाव

थकीत कराचा भरणा न केलेल्या वाहनांचा लिलाव


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकामार्फत थकीत कराचा भरणा न केलेली १७ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. या वाहनांचा लिलाव प्रक्रियेत वाहनचालकांनी थकीत करांचा भरणा करून वाहने सोडवून घेण्याचे आवाहन जळगाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

जप्त करण्यात आलेली वाहने मागील कित्येक वर्षापासून चोपडा एसटी डेपोच्या आवारात अटकाव करून ठेवण्यात आलेली आहेत. सदर वाहनांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने ज्या वाहनधारकांना त्यांची वाहने सोडवून घ्यावयाची असल्यास अशा वाहनधारकांना थकीत कराचा भरणा करणेसंबंधी  आवाहन श्री.लोही यांनी केले आहे.


Protected Content

Play sound