यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या उपस्थित यावल येथे झालेल्या बैठकीत पाटील यांची निवड करण्यात आली. अतुल पाटील यांना बैठकीत नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने सदर नियुक्ती करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुका व गावांमध्ये सर्व सामान्यापर्यंत पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांच्या पक्षाचे विचार व धेय्य धोरण पोहचवून जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विषयी विश्वास निर्माण करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अतुल पाटील यांच्या नियुक्तीचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष तथा माजी मंत्री अरूणभाई गुजराथी, माजी आ. अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, महिला प्रदेश अध्यक्ष सौ रोहिणीताई खडसे, प्रा.सुनील नेवे, राष्ट्रवादी पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी व पक्षातील विविध आघाड्याचे प्रमुख यांनी पाटील यांच्या निवडीचे स्वागत करीत अभिनंदन केले आहे.