भुसावळात जप्त केलेला वाळूचा ट्रक चोरी करण्याचा प्रयत्न; पोलीसात गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाने जप्त करून तहसील कार्यालयात लावला होता. जप्त केलेला ट्रकची चोरी प्रयत्न उघडकीला आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यात अवैध गौण खनीज वाहतुकीवर कारवाई केली जात आहे. यादरम्यान तहसीलदार यांच्या पथकाने अवैध वाळूने भरलेला एक ट्रक पकडला होता. ट्रक चालक गणेश बळीराम सपकाळे (वय-30, रा. बांभोरी, ता. धरणगांव) यांचे यांचेकडे वाळू वाहतूक परवाना नव्हता. ट्रकमधील वाळुचा रितसर पंचनामा करण्यात येऊन ट्रक भुसावळ तहसील कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी जप्त करण्यात आला होता. कार्यालयात आल्यानंतर पाहिले असता, जप्त केलेला वाळुने भरलेला ट्रक ( एमएच 19. झेड 0931 ) आवारात दिसला नाही. याबाबत तलाठी के. आर. ठाकूर यांनी वरिष्ठांना कळविले असता, त्यांनी माहिती दिली की रात्री २ वाजेच्या सुमारास हा ट्रक तहसिल कार्यालय येथुन घेवून जातांना पोलीसांनी पकडला असल्याचे सांगितले.

 

Protected Content