पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावातील एसबीआय बँकेचे शाखेचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी ५ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास समोर आला आहे. या संदर्भात दुपारी दोन वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावात एसबीआय बँकेचे शाखा आहे. बुधवारी५ मार्च रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान आदल्यात तीन जणांनी येऊन बँकेची शाखेचे शटर चे लॉक तोडून हा प्रवेश करत बँकेतून चोरी करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर बँकेचे मॅनेजर तेजस भांबेरे यांनी पाचोरा पोलिसात धाव घेऊन या संदर्भात तक्रार दिली आहे त्यानुसार दुपारी दोन वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके करीत आहे.