Home क्राईम कंपनीत चोरीची प्रयत्न; लोकांना पाहून पळतांना चोरटा जखमी !

कंपनीत चोरीची प्रयत्न; लोकांना पाहून पळतांना चोरटा जखमी !

0
184

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीत चोरी करत असतांना लोक आल्याचे पाहून पळत असतांना रस्त्यावर पडल्याने चोरटा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता घडली आहे. जखमीस एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत..

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील एन. सेक्टरमधील एम.व्ही. फुडस या कंपनीत संतोष नामदेव सैदाणे वय ५० रा. आयोध्या नगर, जळगाव हा चोरी करत होता. त्यावेळी काही लोक या कंपनीत असल्याचे पाहून चोरटा संतोष सैदाणे हा पळत सुटला. त्यावेळी त्याचा तोल जावून तो रस्त्यावर पडला. त्यात तो जखमी झाला. काही नागरीकांनी त्याला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली. पोलीसांनी रात्री १० वाजता जखमीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound