Home क्राईम तरूणाचे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न ; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

तरूणाचे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न ; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रावण नगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण नगर येथील रहिवासी विजय अहिरकर (वय २८, व्यवसाय-नोकरी) यांचे घर १० ते ११ फेब्रुवारी दरम्यान बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. चोरट्यांचा मुख्य उद्देश घरातील मौल्यवान ऐवज लंपास करण्याचा होता, मात्र प्राथमिक माहितीनुसार चोरीचा केवळ प्रयत्न झाल्याचे दिसून आले. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound