कानळदा येथे विवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

galfas1

 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कानळगाव येथील एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने वेळीस आत्महत्येचा प्रयत्न लक्षात आल्यामुळे विवाहितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.

 

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मिनाबाई प्रेमा बारेला (वय 45 रा.कानळदा) या विवाहितेने कोणत्यातरी कारणावरून राहत्या घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. परंतु गळफासचा प्रकार वेळीच सुनेच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड करायला सुरुवात केली. आरडाओरडा ऐकताच घरातील व शेजारी असलेल्या नागरिकांनी विवाहितेला लागलीच खाली उतरवले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत विवाहितेला उपचारासाठी खाजगी वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, गळफास घेण्याचे कुठलेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात कुठलीही नोंद नव्हती.

Add Comment

Protected Content