वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वरणगाव फॅक्टरीत चार्जमन पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्यानेच सैन्य दलासाठी वापरण्यात येणाऱ्या बुंदकीच्या ५ गोळ्या दुचाकीद्वारे चोरीचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी बुधवारी २६ जून रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने फॅक्टरी प्रशासनात खळबळ उडाली असून वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव मध्ये कार्यरत असलेला कनिष्ठ अधिकारी सतीश जयंसिंग इंगळे ए ई (एसक्यूएई ) विभागाचे हा दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास लंच साठी फॅक्टरीच्या बाहेर जात असताना त्याच्या मोटरसायकल क्रंमाक (एमएच १९ ऐटी १५०४) सायकलची अंगझडती सुरक्षा कर्मचारी सी.व्ही.भारंबे (दरबान) यांनी घेतली असता त्यांच्या ताब्यात ऑयध निर्माणीवरणागव येथे तयार होणारी गोळी ( अॅम्युनेशन ) 7.62 ची एके 47 शस्त्र वापरली जाणारी ५ जिवत काडतुस त्याचे मोटरसायकलचे हेडलाईट कव्हर खाली मिळून आले आहेत. बंदुकीच्या गोळ्या सापडलेल्या असून त्यावेळेस सुरक्षारक्षकांनी सुरक्षा अधिकारी यांना बोलवून सदर बाब सांगितली असता त्या सुरक्षा विभागाच्या ऑफिसमध्ये बोलवुन नंतर पोलिसांना बोलवण्यात आले आहे . याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात संभाजी पावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सतीश इंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी करीत आहे.