Home क्राईम गोवंशाची अवैध कत्तल करून मांस विक्रीचा प्रयत्न ; ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

गोवंशाची अवैध कत्तल करून मांस विक्रीचा प्रयत्न ; ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून त्यांच्या मांसाची वाहतूक आणि विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मांस आणि वाहनासह एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंपळगाव हरेश्वर गावातील मकरज मशिदीसमोर असलेल्या एका घरात हा प्रकार सुरू होता. संशयित आरोपी शेख कलीम शेख मोहम्मद (वय ३४) याने कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेता आपल्या राहत्या घराच्या पुढील खोलीत गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली होती. पोलीस हवालदार शांतीलाल बाबुलाल पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता संशयित आरोपी स्वतःच्या ताब्यात गोवंश जातीचे मांस बाळगताना आणि त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करताना आढळून आला.

यावेळी पोलीसांनी ३० किलो मांस, साहित्य व वाहन असे असा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. पांडुरंग गोरबंजारा हे करीत आहे.


Protected Content

Play sound