पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर ‎घालून जिवे मारण्याचा प्रयत्न; ट्रॅक्टरसह १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अहमदनगर जिल्हयात वाळू तस्करांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर देविदास ‎बनसोडे, संतोष कडूबा दळे व सोमनाथ ‎कोंडीराम सुरासे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना श्रीरामपूर तालूक्यातील कमालपूर येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, गोदावरी नदीपात्रातून कमालपूर ‎येथे अवैध वाळू वाहतूक सुरू ‎‎असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी‎ सहायक पोलिस अधीक्षक जीवन ‎‎बेनीवाल यांना शुक्रवारी १८ मे रोजी ‎दुपारी १२ वाजता समजली. ते पथक घेऊन कमालपूरमार्गे दुपारी एक वाजता घटनास्थळी दाखल झाले. येथे दोन ट्रॅक्टर‎ट्रॉलीसह वाळूने भरलेले दिसले. ‎‎हवालदार काळे हे ट्रॅक्टरच्या‎ चालकास थांबवण्याचे सांगत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असताना चालक संतोष दळे यांच्या ‎ताब्यातील ट्रॅक्टर ज्ञानेश्वर बनसोडे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याने स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यांनी‎ संगनमत करून काळे यांच्या अंगावर ‎ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‎काळे हे बाजूला झाल्याने ते वाचले.‎त्यानंतर सदर चालक हा ट्रॅक्टर घेऊन‎ तेथून पळून गेला.

त्यानंतर पोलिस‎ पथकातील रणनवरे व वारे यांनी सदर‎ ट्रॅक्टर चालकास पकडून आणले.‎ पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचा‎ ट्रॅक्टर (एमएच १७ एव्ही ४३६७) त्यात‎ दोन ब्रास वाळू आणि दुसरा ट्रॅक्टर‎ (एमएच १७ सीआर ५२०२) त्यात दोन‎ ब्रास वाळू असा एकूण १२ लाखांचा‎ मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी‎ हवालदार काळे यांनी तालुका‎ पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरून ‎शासकीय वाळूची चोरी, पोलिसाच्या ‎अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा‎ प्रयत्न व सरकारी कामात अडथळा‎आणल्या प्रकरणी पुढील तपास‎श्रीरामपूर तालुका पोलिस करीत‎आहेत.‎

Protected Content