Home क्राईम किरकोळ वादातून कोयत्याने हल्ला; एका कुटुंबातील दोघांना दुखापत

किरकोळ वादातून कोयत्याने हल्ला; एका कुटुंबातील दोघांना दुखापत

0
141

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील उस्मानिया हॉटेलसमोर एका किरकोळ वादातून एका व्यक्तीने कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने फिर्यादी आणि त्याच्या मुलावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडीचा धक्का लागल्यामुळे वाद
भुसावळ शहरातील खडका रोडवरील उस्मानिया हॉटेलसमोर इकबाल जुम्मा पिंजारी (वय ४२, रा. खडका रोड, भुसावळ) हे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १.२५ वाजता जात असताना, संशयित आारोपी आगा उर्फ तौसीफ भाई (वय ३०, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) याच्या गाडीचा धक्का त्यांच्या मुलाला लागला. यावरून इकबाल पिंजारी यांनी आरोपीला जाब विचारला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर कोयत्याने हल्ला केला.

वडील आणि मुलावर प्राणघातक हल्ला
आरोपी तौसीफ भाईने पहिल्यांदा फिर्यादी इकबाल यांचा मुलगा जुनेद याच्या मांडीवर कोयत्याने वार केला. त्यानंतर इकबाल यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले असता, आरोपीने त्यांच्या हाताच्या पंजावर आणि करंगळीवर देखील कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू
या गंभीर घटनेनंतर फिर्यादी इकबाल पिंजारी यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार कांतीलाल केदारे करत आहेत.


Protected Content

Play sound