Home क्राईम बांधकाम साहित्याची चोरी रोखणाऱ्यावर लोखंडी सळईने हल्ला !

बांधकाम साहित्याची चोरी रोखणाऱ्यावर लोखंडी सळईने हल्ला !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनीमध्ये बांधकामाच्या ठिकाणी असलेले साहित्य चोरून नेण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एका मजुरावर लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद रतन गोपाळ (वय ३६, रा. पिंप्राळा) हे मयुर कॉलनीतील एका बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून कार्यरत आहेत. ७ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास, संशयित आरोपी अजय देविदास साबळे (रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा) हा बांधकामाच्या ठिकाणाहून लोखंडी सळई चोरून घेऊन जात होता.

आपल्या कामाच्या ठिकाणचे साहित्य चोरीला जात असल्याचे पाहून आनंद गोपाळ यांनी संशयित आरोपीला अडवले आणि साहित्य नेण्याबाबत विचारणा केली. याचा राग मनात धरून संशयित आरोपी अजय साबळे याने आनंद गोपाळ शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तसेच लोखंडी सळईने मारहाण केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कालसिंग बारेला हे करीत आहे.


Protected Content

Play sound