धुडकू सपकाळे हल्ला; पाचही संशयितांना एक दिवसाची पोलीस कोठडी

27f8ea4f 18ce 4fd1 9eb6 331609681188

जळगाव प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ते धुडकू सपकाळे यांच्यासह एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाचही संशयितांना न्यायालयाने आज एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसी हद्दीतील काशिनाथ हॉटेलजवळ हमाल-मापाडी संघटनेचे नेते तसेच नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती धुडकू सपकाळे आणि गजानन देशमुख या दोघांवर तलवार व बेस बॉलच्या बॅटच्या सहाय्याने चढविला होता. हल्ला केल्यानंतर चौघे घटनास्थळावरून पसार झाले होते. एमआयडीसी पोलीसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासात पाच संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांमध्ये कॉमेश रवींद्र सपकाळे, मयूर इंद्रराज सपकाळे, नितीन प्रकाश सोनवणे, मनोज प्रकाश सोनवणे, विजय उर्फ भुऱ्या कमलाकर सपकाळे यांचा समावेश होता. या पाचही जणांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता, सर्वाना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Protected Content