मोर्शी येथे स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर हल्ला ; गाडी पेटवली

Morshi 1

अमरावती वृत्तसंस्था । जिल्ह्यातला मोर्शी हा विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर जीवघेणा हल्ला आणि गोळीबार झाल्याची माहिती समोर येत असून हल्लेखोरांनी गाडीही पेटवली आहे. आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी साडेपाच वाजता गाडीतून खेचून मारहाण केली. त्यावेळी शहरातील काही लोक मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी गोळीबाराचा आवाज आल्यानंतर वाचवण्यासाठी धाव घेतली. यात देवेंद्र बचावले असले तरी त्यांची चारचाकी गाडी जळून राख झाली आहे. या घटनेनंतर भुयार यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content