पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बोळे येथे पतीला जीवे ठार मरण्याची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या दोन जणांना पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील बोळे येथील विवाहिता आपल्या पतीसह राहतात. गावातील ज्ञानेश्वर आनंदसींग गिरासे हा विवाहितेच्या पतीला दारू पाजण्यासाठी घेवून गेला. त्यानंतर ज्ञानेश्वर गिरासे हा विवाहितेच्या घरी येवून नवऱ्याला ठार मारण्याची धमकी देवून दमबाजी केली व महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी पुन्हा फोटो दाखवून तुझ्या पतीला मोनु उर्फ सचिन पाटील याला सांगून समाजात बदनामी करेल अशी धमकी दवेून अत्याचार केला. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता पारोळा पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द तक्रार दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड करीत आहे.