पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या एका ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात ६ वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. १७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी गावातील अकबर युसूफ तडवी (वय-४०) रा. खंडेराव नगर पहूरपेठ या फुस लावून उचलून नेले. गावातील निर्जळ ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर पहूर पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अकबर तडवी याच्याविरूध्द बाल लैगिंक अत्याचार अन्वये पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि अमोल देवढे करीत आहे.