भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
भडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारी 6 वर्षीय बालिका आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील संशयित आरोपी विकास सिताराम पाटील याने गोड बोलून मुलगी खेळत असताना घरात बोलून, ‘मी पैसे देतो कुणाला काहीही सांगू नको’, असे म्हणून दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. यासंदर्भात पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितले. नातेवाइकांनी भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन पीडित मुलीचे आजोबा यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विकास सिताराम पाटील यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करीत आहे.