वांजोळा गावात पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वांजोळा येथे एक पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार आज घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

या संदर्भात माहिती अशी की, तालुक्यातील वांजोळा येथे आज पाच वर्षे वय असणार्‍या एका बालिकेवर शारीरीक अत्याचार करण्यात आल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यामुळे तालुका पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी याबाबतची पूर्ण माहिती प्रसारमाध्यमांना दिलेली नाही. या संदर्भात तालुका पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, वांजोळा येथील या भयंकर घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी तातडीने पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ही मुलगी मूकबधीर असून तिच्या काकानेच तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी असणार्‍या नराधम काकाला अटक करण्यात आली आहे.

 

Protected Content