Home क्राईम एटीएमची आदलाबदल, महिला अधिकाऱ्याला लावला ५० हजारांचा चुना

एटीएमची आदलाबदल, महिला अधिकाऱ्याला लावला ५० हजारांचा चुना

0
109

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दादावाडी परिसरातील एटीएममध्ये बोलण्यात गुंतवून ठेवत एटीएम कार्डची अदलाबदल करीत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अनिता गणेश पाटील (वय ४६, रा. दादावाडी) यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये परस्पर काढून घेतले. ही घटना शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपाजवळ घडली. याप्रकरणी शनीवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशूधन विकास अधिकारी म्हणून नियुक्ती असलेल्या अनिता पाटील या दादावाडी परिसरात वास्तव्यास आहे. त्यांनी कैलास रमेश बोरसे (वय ४१, रा. मोहाडी, ता. जळगाव) यांना १४ नोव्हेंबर रोजी रोजी एटीएम कार्ड दिले. कार्ड घेवून बोरसे हे गुजराल पेट्रोलपंपजवळील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. पैसे काढत असतांना पहिल्यांदा पैसे निघाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने मदत करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवूण ठेवले व एटीएम कार्डची अदलाबदल केली.
थोड्यावेळानंतर अनिता पाटील यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये कपात झाल्याचा त्यांना मॅसेज आला. अनिता पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound