चोपडा, प्रतिनिधी | येथील पंकज कला व विज्ञान महाविद्यालयमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे वक्तृत्व व वादविवाद विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संभाजी देसाई हे होते. प्रतिमा पूजन व स्वागत सत्काराने या कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ. संभाजी देसाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व कार्यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा परामर्श घेतला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अरुण मोरे यांनी केले. तर आभार प्रा. सुनिल सुरवाडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.