सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण यांची पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील पोलीस ठाण्यात मागील वर्षापासून कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण यांना पोलीस उपनिरिक्षक या पदावर पदोन्नती मिळाली असुन, पोलीस निरिक्षक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले आहे

पोलीस उपनिरिक्षक म्हणुन पदोन्नती मिळालेले नितिन खूबचंद चव्हाण हे मुळ जळगाव येथील रहिवासी असुन ते सन् १९९४ मध्ये पोलीस खात्यात नौकरीस लागले असुन त्यांनी जळगाव ,जळगाव शहर, सावदा,पहुर पोलीस ठाणे, भुसावळ वाहतुक शाखा , फत्तेपुर तालुका जामनेर व यावल अशी पोलीस विभागात तिस वर्ष सेवा बजावली असुन,त्यांनी या ठिकाणी कर्तव्य बजावतांना कर्तव्याची जाण व प्रसंगी सर्वसामान्य व्यक्तिस न्याय मिळुन देण्यासाठी शिस्तीने कायदाची कठोर अमलबजावणी करीत पोलीस विभागात आपली सेवा बजावली आहे.

पोउनिपदी नितिन चव्हाण यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रदिप ठाकुर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी , पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक राजेन्द्र साळुंके, पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान पठाण, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, सहाय्यक फौजदार असलम खान यांच्यासह यावल पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी मित्र यांनी त्यांच्या पदोन्नतीचे स्वागत केले आहे .

Protected Content