शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बांगलादेशात झालेल्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या धार्मिक हिंसाचाराच्या निषेधार्थ,सकल हिंदु समाज तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला शुक्रवारी शेंदुर्णी मध्ये भव्य मुक मोर्चा काढत पोलिसांना निवेदन देण्यात आले. शंभर टक्के व्यापारी बाजारपेठ बंद होती. वाडी दरवाजा भागातुन भव्य मुक मोर्चास सुरुवात झाली . यात सकल हिंदु समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, शिव प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद हिंदु जागरण मंच, वारकरी संप्रदाय, शहर पत्रकार संघटना, व्यापारी वर्ग यांच्यासह विविध संघटना सहभागी झालेल्या होत्या.
सकाळी पासुनच संपुर्ण बाजारपेठ आवाहन करण्यात आले होते त्याला सकारात्मक प्रतिसाद देत बांगला देशात हिंदुंवर झालेल्या अत्याचारांचा निषेध व्यक्त करत बंद पुकारण्यात आला होता. मुक मोर्चा वाडी दरवाजा, येथुन निघुन शहरातील विविध भागातुन शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे संपन्न झाला.यावेळी प्रास्ताविकात भिका इंदलकर यांनी या मुक मोर्चाच्या मागची संकल्पना मांडली, सतिष बारी यांनी पद्य सादर केले. यावेळी ह.भ.प.कन्हैय्या महाराज परदेशी यांनी आपल्या ओघवत्या भाषणात बांगला देशात ठरवुन फक्त हिंदुंना लक्ष केले जात असुन या बहिणींवर अन्वनीत अत्याचार केले जात आहे.या विरोधात स्वतः ला धर्मनिरपेक्ष आणि हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या संघटना पक्ष मात्र साधा निषेध सुद्धा व्यक्त करत नाही याबाबत प्रचंड रोष व्यक्त केला.
आपले पक्ष, संघटना,जात वेगवेगळ्या असतील मात्र आधी आपण भक्त हिंदु आहोत हे लक्षात ठेवावे असे सांगताना ते म्हणाले हिंदु सहिष्णु आहे मात्र त्यांच्या संयमाची जास्त परिक्षा बघु नका अन्यथा हिंदुं सुद्धा एकत्र आल्यानंतर इतिहास घडवतात हे विसरु नये असा इशारा त्यांनी आपल्या भाषणात दिला.यावेळी सकल हिंदु समाजाच्या वतीने बांगला देशातील घटनेचृया निषेधार्थ पोलिस निरीक्षक सचिन सानप,पोउनि.दिलीप पाटील यांना दुर्गा वाहिनीच्या वतीने निवेदन देण्यात आले.पोलीस प्रशासनाने चौक बंदोबस्त ठेवला होतो.दिवसभर संपुर्ण बाजारपेठ बंद होती शांततेत बंद पाळण्यात आला.