जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील धनाजी काळे परिसरातील मंदीराजवळ एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची दुचाकी अडवून त्याला मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रोहित अनिल पेंढारकर (वय-१७, रा.छत्रपती शिवाजी नगर हुडको, जळगाव) हा मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २८ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता त्याच्या दुचाकीने घरी जात असताना धनाजी काळे नगरातील मंदिराजवळ दोन जणांनी त्याचा रस्ता अडविला. दोघांनी सांगितले की, आर्यनच्या नांदी का लागतो, आम्हाला यश अंभोरे भाईने तुम्हाला ठोकून काढण्याचे सांगितले आहे, असे म्हणत रोहितला अल्पवयीन आलेल्या दोघांनी कानशिलात लगावली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान याप्रकरणी रोहित पेंढारकर यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार मारहाण करणारे दोघी अल्पवयीन मुले आणि यश अंभोरे रा. गेंदालाल मिल आणि आर्यन संजय सपकाळे रा. शिवाजीनगर हुडको, जळगाव अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील करीत आहे.