लहान मुलांच्या भांडणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून चौघांनी योगेश गौतम सपकाळे (वय २४, रा. शिवाजी नगर हुडको) यांना लाकडी दांडक्यासह कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शुक्रवारी चौघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात योगेश गौतम सपकाळे (वय २४) हा तरुण वास्तव्यास आहे. गुरुवार २४ ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास आर्यन सपकाळे, बुध्दम सपकाळे, मयूर पेंढारकर यांच्यात किरकोळ वाद झाले. या वादाचे रुपांतरण हाणामारी होवून आर्यन सपकाळे यांच्यासोबत झत्तलेल्या वादाचा राग मनात घेवून चौघांनी योगेश सपकाळे व गौतम सपकाळे यांना चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच बबलू उर्फ सुकलाल पेंढारकर यांनी गौतम सपकाळे यांच्या डोक्यात लाकडी दांडा मारुन गंभीर जखमी केले. तसेच अनिल पेंढारकर याने त्याच्याजवळील कुऱ्हाडीने तर सागर सोनवणे याने फरशीचा तुकडा मारुन जखमी केले. यापकरणी योगेश सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अभय पेंढारकर, बबलू उर्फ सुकलाल पेंढारकर, अनिल पेंढारकर, सागर सोनवणे (सर्व रा. शिवाजी नगर, हुडको) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ हे करीत आहे.

Protected Content