जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये या कारणावरून एकाला शिवीगाळ करून मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देत चांदेलकर क्लब मधील गल्ल्यातून ८ हजार रुपयांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीचे फर्निचरची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली आहे या संदर्भात शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ३ वाजता १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अरुण भीमराव गोसावी वय-४९, रा.तुकारामवाडी जळगाव हा आपला कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याचे जळगाव शहरातील चांदेकर प्लाझा येथे क्लब आहे. दरम्यान सन-२०२२ मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये या कारणावरून त्याच्या क्लबवर भूषण विजय माळी उर्फ भाचा, पवन दिलीप बाविस्कर उर्फ बंड्या, आकाश सुकलाल ठाकूर उर्फ खंड्या, आकाश रवींद्र मराठे उर्फ अक्की, दादू विजय ठाकूर सर्व रा. तुकाराम वाडी, जळगाव आकाश संजय पाटील रा.वाघ नगर, चेतन रमेश सुशीर उर्फ बटाट्या, उमेश उर्फ उमाकांत दत्तात्रय वाघ, भूषण अहिरे, उमाकांत पाटील तिघे रा. पिंप्राळा, सचिन कैलास चौधरी उर्फ टिचकुल्या रा.सन्नाट कॉलनी, विकी ईश्वर चौधरी रा. आयोध्या नगर, विनायक कोळी, जे.के. (पुर्ण नाव माहित नाही), पी.के. (पुर्ण नाव माहित नाही) रा. जळगाव अशा १५ जणांनी अरूण गोसावी यांच्या त्याच्या क्लबमध्ये घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली. तसेच त्याच्या क्लबच्या गल्ल्यातील ८ हजार रुपयांची रोकड काढून घेत क्लबमधील खुर्ची आणि फर्निचरची तोडफोड करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अरुण गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आकाश संजय पाटील (वय-२१) आणि उमाकांत दत्तात्रय वाघ (वय-२१) रा.पिंप्राळा या दोघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर करीत आहे.



