धमकी देत महिलेवर अत्याचार; नराधमला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेला धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे. याप्रकरणात नराधमाला अटक करण्यात आली असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी वय-४० रा. हरीविठ्ठल नगर जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

हरीविठ्ठल नगर परिसरातील एका भागात २४ वर्षीय महिला ही आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे. दरम्यान बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास महिला ही आपल्या मुलांसह झोपलेली असताना संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास कोळी हा महिलेच्या घरात घुसला. त्यानंतर महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच घरातून जात असताना “तू जर कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेल” अशी धमकी दिली. दरम्यान या संदर्भात पीडित महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजता संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहे.

Protected Content