जुन्या वादातून बापलेकावर प्राणघातक हल्ला; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सारबेटे गावातील बसस्थानकाजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणासह त्याच्या वडीलांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड, तलवार आणि टॅमीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजता १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, नाजीमखान गुलताजखान मेवाती वय २६ हे आपल्या परिवारासह अमळनेर तालुक्यातील सारबेटा येथे वास्तव्याला आहे. शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून नाजीमखा मेवाती व त्याचे वडील गुलताजखान मेवाती या बापलेकाला गावातील बसस्थानकाजवळ गावात राहणारे असलमखा गुलामनबी मेवाती, अक्रमखा गुलामनबी मेवाती मशीदखा मस्तानखा मेवाती, फैजलखा शफिकखा मेवाती, फरीदखा गुलामनबी मेवाती, ताहेर अहमतद रहेमान मेवाती, कदामद अब्दुल रहेमान मेवाती, कादरखा गुलामनबी मेवाती, सरफराज गुलाम हुसैन, समीरखा गुलाम हुसैन मेवाती, बरिदखा मस्तानखा मेवाती, आजमखा गुलामनबी मेवाती, मुमताजबी गुलामनबी मेवाती, बानुबी सादीकखा मेवाती, फिरोजाबी निजामखा मेवाती सर्व रा. सारबेटे ता. अमळनेर यांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड, तलवार आणि टॅमीने दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत नाजीमखा मेवाती व त्याचे वडील गुलताजखान मेवाती हे गंभीर जखमी झाले. जखमींना धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नाजीमखा मेवाती याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.

Protected Content