जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बजरंग बोद्याद्या पर्यंतच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला गुरूवार ७ डिसेंबर रोजी दुपारपासून करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून पिंप्राळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बजरंग बोगदा पर्यंतचा रस्ता व्हावा अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरीकांची मागणी होती. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला देखील निवेदन देण्यात आले होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आ. राजूमामा भोळे, माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, सुरेश सोनवणे, विजय पाटील, मयूर कापसे, अतुल बारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांची भेट घेऊन तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत मागणी केली होती. अखेर या रस्त्यांच्या कामाला गुरूवार ७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून सुरूवात करण्यात आले. याप्रसंगी ठेकदार नरेंद्र पाटील, कॉन्ट्रॅक्टर किरण भोई, विकास चौधरी, बबलू बारी, विजय निकम, शांताराम बारी आदी उपस्थित होते.