अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील शहापुर येथे रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण कामाचे भुमिपूजन आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून कळमसरे ते शहापुर सात किलोमीटर रस्ता एकाच टप्प्यात डांबरीकरण करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी आमदार अनिल पाटील यांना निवेदन दिले.
गेल्या दोन पंचवार्षिक पासून या रसत्याची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र लोकप्रतिनिधीनी नेहमीच दुर्लक्ष केला असल्याचा आरोप केला आहे. सद्यस्थितित हा रस्ता जिल्हा परिषदेच्या निधीतुन दोन किलोमीटर मंजूर झाला असल्याने त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र यापुढील दोन किलोमीटर रस्ता हा पूर्णता खराब झाला असल्याने यावर पायी चालणे अवघड झाले आहे. तर पुढील टप्प्यात रस्ता खड्डेमय झाला असल्याने या रसत्यावरिल वाहन सेवा पूर्णता बंद पडल्याने मागील तीन वर्षापासून यामार्गाने जाणारी शिरपुर बससेवा बंद पडली आहे.
आ.अनिल पाटील यांचे आश्वासन
ग्रामस्थानी शहापुर रसत्याच्या समस्येचा पाढा वाचल्याने पुढील टप्प्यातील रसत्याचे काम लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सरपंच जगदीश निकम ,उपसरपंच जितेंद्र राजपूत, तंटामुक्ति अद्यक्ष योगेंद्रसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य दिनकर पारधी, जे वाय कुंभार, दिनेशसिंग राजपूत, देवीदास चौधरी, हेमंत चौधरी, अरुणसिंग राजपूत, दीपचंद छाजेड, रमेश चौधरी आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.