नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यातील दुय्यम पोलिस निरीक्षक अशोक नजन यांनी मंगळवारी सकाळी पोलिस स्टेशनमध्ये स्वतःच्या सर्विस रिव्हायलवरने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. नजन यांनी टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र या प्रकरणी पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे. सदरील घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक तसेच गुन्हे शाखेचे उपयुक्त प्रशांत बच्छाव यांनी अंबड पोलिस ठाणे गाठले आहे.
शहरालगतच असलेल्या अंबड पोलिस ठाण्यात अनेक गुन्ह्यांचा तपास केला जातो. मात्र, आता या गुन्ह्यांचा तपास करणारे दुय्यम पोलिस निरीक्षक अशोक नजन यांनीच आपल्या सर्व सर्विस रिव्हायलरने आत्महत्या केली. आपल्या कॅबिनमध्ये बसलेले असताना त्यांनी खुर्चीवर स्वतःला गोळी मारून घेतली. अशोक नजन यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.
दुय्यम पोलिस निरीक्षक अशोक नजन हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाले. ते त्यांच्या केबिनमध्ये बसलेले होते. तर बाहेर कर्मचाऱ्यांची सकाळच्या कामाची लगबग सुरू होती. सर्व कर्मचारी हजर झाल्यानंतर त्यांची हजेरी घेण्यात येते. त्यानुसार हजेरी घेण्यात आली. हजेरी झाल्यानंतर हजेरीचे रजिस्टर हे अशोक नजन यांना दाखवण्याची प्रथा आहे. त्यानुसार शरद झाेले हे केबिनमध्ये गेले असता त्यांना अशोक नजन हे रक्ताच्या थारोळ्यात खुर्चीवर पडलेले दिसून आले. त्यानंतर त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बोलावले.