जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा सार्वजनिक विद्यालयात शुक्रवारी महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यामिनी कोळी या विद्यार्थिनीने भूषविले.
यावेळी इ.७वी च्या विद्यार्थिनींनी ‘मुलगी वाचवा’ यावर आधारित नृत्य सादर केले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विलासदादा चौधरी,सचिव कमलाकर सावदेकर, संचालक किशोर चौधरी, स्थायी सभासदांचे चिरंजीव हरिष भोळे व शाळेचे पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल उपस्थित होते. नवज्योतींच्या स्वरूपात अक्षदा सोनवणे, हिताक्षी पाटील, सानिका फेगडे,चैताली सोनवणे, प्रज्ञा सपकाळे, लतिका बिऱ्हाडे, तोषिता चौधरी, शुभांगी सपकाळे, जयश्री बाविस्कर या विद्यार्थिनी होत्या. या विद्यार्थिनींना चारुलता टोके,मंगला नारखेडे, शुभांगीनी महाजन या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी महिला शिक्षकांसाठी भावना महाजन यांनी मनोरंजक खेळांचे आयोजन केले. सूत्रसंचालन प्रीती बाविस्कर व कोमल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अक्सा पिंजारी हिने केले. सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य लाभले.