Home Cities अमळनेर जिल्हा बँकेच्या संचालकपदी आ. अनिल पाटील यांची बिनविरोध निवड

जिल्हा बँकेच्या संचालकपदी आ. अनिल पाटील यांची बिनविरोध निवड


अमळनेर प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत विकासोच्या गटातून प्रतिस्पर्धी उमेदवाराचे अपील विभागीय सहनिबंधकांनी फेटाळल्याने आमदार अनिल पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व अभिनंदन होत आहे.

यानिमित्ताने आ.अनिल पाटील यांनी बँकेत संचालकपदाची हट्रिक पूर्ण केली आहे. याचा परिणाम आगामी बाजार समितीच्या निवडणुकीवरही होण्याचे संकेत मिळत आहेत. याआधीच एक प्रबळ उमेदवार म्हणून आ. अनिल पाटील यांच्याकडे पाहिले जात असताना सोसायटी गटातील प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आ. स्मिता वाघसह अन्य दोन उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने या गटात आता आमदार अनिल पाटील यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र त्यानंतर अर्ज फेटाळले गेलेल्या भाजपच्या 9 उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. त्यात स्मिता वाघ यांचाही समावेश होता मात्र सदरचे अपील विभागीय सहनिबंधकांनी फेटाळून लावल्याने आ. अनिल पाटील बिनविरोध विजयी झालेत. त्यामुळे राष्ट्रवादी व महाविकास कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

आ.अनिल पाटील यांची बिनविरोध निवड तथा हेट्रिक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीची राज्य भरातील नेते मंडळी तसेच जिल्ह्यातील आमदार व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले तर अमळनेर मतदारसंघातुन जवळपास प्रत्येक गावातील हितचिंतक व कार्यकर्ते त्यांच्या सत्कारासाठी आमदार निवासात भेट देत आहेत.


Protected Content

Play sound