लोकलमध्ये अचानक झोप लागल्याने चोरटयांनी तरूणीचा आयफोन व सोन्याची चेन लांबविली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील लाखो नागरिक दररोज लोकलने प्रवास करतात. यादरम्यान अनेक दुर्देवी आणि अनपेक्षित घटनाही घडत असतात. अशातच लोकलमध्ये झोप लागल्यामुळे एका तरुणीसोबत वाईट घटना घडली आहे. आपले काम संपवून या तरुणीने दादरहून लोकल पकडली. तिला ठाण्याला उतरायचे होते. मात्र ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान तिला झोप लागली. लोकल कसारा कारशेडला पोहचल्यावर तिला जाग आली. यावेळी तिला आपण कसाऱ्याच्या कारशेडमध्ये पोहोचल्याचे लक्षात आले. यावेळी तिचा महागडा आयफोन आणि गळ्यातील सोन्याची चेन गायब असल्याचे दिसले. यानंतर तिने रेल्वे पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी तातडीने या प्रकरणात शोधाशोध सुरू केली. पोलिसांनी या प्रकरणात आशिष मकासुरे नावाच्या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने त्याची आई आजारी आहे. त्याला आईवर उपचार करण्यासाठी पैशांची गरज होती. म्हणून त्याने तरुणीच्या झोपेचा फायदा घेत महागडा मोबाइल आणि सोन्याची चेन चोरी केल्याचे सांगितले.

बुधवारी रात्री ठाण्यात राहणारी 23 वर्षीय तरुणी मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये शेफचे काम करते. ती तिचं काम संपवून दादर स्टेशनवर आली. येथून तिने लोकल पकडली. तिला ठाण्याला उतरायचे होतं. मात्र माटूंगा स्टेशन आल्यानंतर तिला अचानक झोप लागली. तरुणी जेव्हा झोपेतून जागी झाली तेव्हा लोकल ट्रेन कसारा कारशेडला पोहचली होती. यावेळी तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि महागडा आयफोन गायब असल्याचं लक्षात आले. फोन नसल्यामुळे तिला काही सूचत नव्हते. तिने कसारा स्टेशनहून लोकल पकडली आणि कल्याणला आली. यादरम्यान लोकलमध्ये तैनात असलेल्या आरपीएफ जवानांनी एका तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे महागडा मोबाइल आणि चैन सापडली होती. वारंवार विचारुन देखील तरुण त्याच्याकडे महागडा मोबाईल आणि चैन कुठून आली हे सांगत नव्हता. शेवटी आरपीएफ जवानाने त्याला कल्याण जीआरपीमध्ये आणले.

यावेळी ती तरुणी देखील तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर होती. थोड्याच वेळात आशिष मकासुरे याची चोरी पोलिसांनी पकडली. धक्कादायक म्हणजे आशिष हा भांडूपचा राहणारा आहे. त्याची आई आजारी आहे. वडील नाहीत. आशिष छोटेमोठे काम करतो. आईच्या उपचारासाठी पैसे पुरत नव्हते. त्याला पैशाची गरज होती. म्हणून त्याने तरुणीचा मोबाइल आणि चेन चोरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कल्याण जीआरपी पोलिसांनी आणखीन एक आरोपीला अटक केली आहे. ज्याचे नाव विशाल प्रसावधान असे आहे. या आरोपीने देखील कल्याण रेल्वे स्थानकातून एका प्रवाशाचा मोबाइल चोरी केला होता. विशाल हा गुजरातला चालला होता. त्याने मोबाईल चोरी का केला. याचा तपासही कल्याण जीआरपी करीत आहे.

Protected Content