नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचे पार्थिव भाजपच्या मुख्यालयात आणण्यात आले असून येथे त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी उसळली आहे.
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे काल निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, आज सकाळी त्यांचे पार्थिवर भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात आणण्यात आले आहे. येथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रांग लागली आहे. पक्षाचे मंत्री, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चाहते यांनी अरूण जेटली यांना आदरांजली अर्पण केली आहे.