रावेर (प्रतिनिधी) निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असून या पार्श्वभूमीवर प्रशासन पैसा , दारू , शस्त्रे यांची वाहतूक होवू नये यासाठी सजग असताना आज सोमवारी सकाळी चोरवड येथील तपासणी नाक्यावर बस मधून भुसावळला दारू नेणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे.
रावेर पोलीस हद्दीला लागून मध्यप्रदेशाची हद्द येते , इकडून मोठ्या प्रमाणात गुटखा, गो-मांस व अनेक अवैध शस्त्र यांची वाहतूक ब ऱ्याचदा पकडली गेली आहे . सोमवारी सकाळी ७.३० वा निवडणुकीच्या अनुषंगाने बस व वाहनांची तपासणी पोलीस कॉन्स्टेबल मोसोरोद्दिन व नवाज तडवी करत असताना , चोरवड येथील तपासणी नाक्यावर बर्हाणपूर-धुळे बस (क्रमांक एम. एच. ४० , एन ९०३९) आल्यावर तपासणी सुरु असताना बस मधील एका सीटवर २४ वर्षीय युवक बसलेला होता. त्याच्या पायाजवळ सीटखाली असलेल्या दोन काळ्या व एक चॅ कलेटी रंगाच्या बॅगेत , ५ हजार ४०० रुपयांच्या ऑफिसर चॉईस व ७ हजार २०० रुपयांच्या मॅकडोल दारू आढळून आली . याबाबत बर्हाणपूर येथील इतवारागेट जवळील राहुल पटेल याला अटक करून , रावेर पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली विजू जावरे व नीलेश चौधरी करीत आहे.