मोबाईलसह कॅमेरा लांबविणाऱ्या मायासह नाकतोड्याला अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दाणाबाजार परिसरात धूम स्टाईलने चित्रकीकरण करीत असलेल्या पत्रकाराचा कॅमेरा व मोबाईल लांबविणार्‍या अल्पवयीन असलेल्‍या मायासह नाकतोड्या व त्याच्या साथीदाराच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

शहरातील सानेगुरुजी चौकातील फु्रट गल्लीच्या वळणावर लॉकडाऊनचे चित्रिकरण करीत असलेले पत्रकार अल्ताफ इस्माईल शेख (वय-३०) रा. शेरा चौक, मेहरूण यांच्याकडील कॅमेरा व मोबाईल (एमएच १९ सीडी ३३१३) क्रमांकाच्या दुचाकीवर धूम स्टाईल ट्रिपल सीट आलेल्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २९ रोजी भरदिवसा घडली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दुचाकीच्या क्रमांकावरुन दुचाकीचा शोध घेण्याचे सुचना पथकाला दिल्या. 

दुचकीवरुन येत कॅमेरा लांबविल्याची संपूर्ण घटना त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असता यात छोटा माया, नाकतोड्या व त्याचा साथीदार असल्याचे समजले. पथकाने तात्काळ तपासचक्रे फिरवित प्रजातप नगरातून संशयित आरोपी आकाश उर्फ नाकतोडा संजय मराठे (वय २१) रा. चौघुले प्लॉट कल्पेश उर्फ बाळू देविदास शिंपी रा. घरकुल याच्यासह छोटा माया या अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेला कॅमेरा, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, राहूल पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांच्या पथकाने अवघ्या काही तासातच जबरी लुट करणार्‍या तिघ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

Protected Content