मटका खेळ खेळवणाऱ्या संशयिताला अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-पहुर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ मटका खेळ खेळणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव ते पहुररोड वरील इंडियन पेट्रोल पंपाजवळ गणेश मुरलीधर महाजन रा. आनंद नगर, जामनेर ह.मु. शिव कॉलनी जळगाव हा व्यक्ती मिलन मटका नावाचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील, पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर असे पथक रवान झाले. पहूर रोडवरील इंडियन पेट्रोल पंपाजवळील एमएसईबी कंपाऊंड भिंडीच्या आडोश्याला लोकाकडून पैसे घेवून जुगार खेळतांना आढळून आला. सोमवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता पोलीसांनी छापा टाकून संशयित आरोपी गणेश महाजन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व ७३० रुपयांची रोकड हस्त केले आहे. याबाबत पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Protected Content