चाळीसगाव प्रतिनिधी । अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणी ताब्यात असणारा अट्टल चोरटा याच्याकडून दागीने व सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील पंडीत मोतीराम सराफ दुकानातुन ९० ग्रॅम सोन्याचे दागीने चोरणारा अट्टल गुन्हेगारास पकडण्यासाठी पो. नि. विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पथकाचे पोलीस नाईक राहुल पाटील, पो कॉ गोवर्धन बोरसे, गोपाल बेलदार, प्रविण सपकाळे यांनी त्याठिकाणी सापळा रचला होता. हैदर सादीक सैय्यद (२९) रा भिवंडी गायबी नगर ओलीया मस्जीद खान कंपाउंड मोमीनपुरा, ह मु आस्का कॉलनी मालेगाव हा मोटारसायकलवर आला. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या पोलीसांनी त्याच्यावर झडप घालुन अटक केली होती. त्याची पोलीस कोठडी घेतल्यावर त्याने चाळीसगाव येथुन चोरी केलेले ५० ग्रॅम सोने व चोरलेली २० ग्रॅम सोन्याची सोनसाखळी काढुन दिली आहे त्याच्या कडुन अजुन मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि आशिष रोही व उपनिरीक्षक मछिंद्र रणमाळे करीत आहेत.