भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शिरपूर शिवारात शिवारातील व्ही.आय.पी. कॉलनी जवळ बनावट देशी दारू कारखाण्यासंबंधीत मुख्य सूत्रधारास पकडून कार्यवाही करावी, अशी मागणी पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे राज्य उत्पादन शुल्क व दारू बंदी निरीक्षक भुसावळ विभागास निवेदनाव्दारे केली आहे.
तक्रारी निवेदनात म्हटल्याप्रमाणे, भुसावळ तालुक्यातील शिरपूर कन्हाळे शिवारातील व्ही.वाय.पी.कॉलनी जवळील रविंद्र ढगे यांचे मालकीचे गणेश पावडर कोटींग फर्निचर चे गोदामात टँगो पंच देशीदारूचा बनावट नकली दारू तयार करण्याचा कारखाणा अनेक दिवसापासुन कुणाच्या वरद हस्तामुळे चालू होता व त्या कारखाण्याचा मुख्य सूत्रधार कोण याची चौकशी करून त्यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच राज्य उत्पादन शुल्क व दारू बंदी अधिकारी भुसावळ विभाग भुसावळ यांचे कार्यालयाचे २ कि.मी.चे अंतरावर सदरचा बनावट दारूचा कारखाना राजरोषपणे चालू असताना त्यांनी जाणून बुजून त्या कारखाण्या कडे दुर्लक्ष केलेले आहे व त्यांच्या वरद हस्तामुळे भुसावळ शहर व तालुक्यातील सर्व अधिकृत व अनाधिकृत दारू विक्रेत्यांच्या दुकानावर ही बनावट दारूच्या पुरवठा झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही
म्हणून भुसावळ शहरातील व तालुक्यातील सर्व अधिकृत दारू दुकानाची तपासणी करण्यात यावी अशी कायदेशीर कार्यवाही करण्यात येण्यासाठी रिपब्लकिन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे वतीने दि. २३/७/२०२१ रोजी लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयाचे आवारात तीव्र स्वरूपाचे निर्दशन करण्यात येत आहे.आपण याची नोंद घ्यावी.
प्रमुख मार्गदर्शक- उ.मा.अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी, खान्देश प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, युवा नेते पप्पू सुरडकर, शरद सोनवणे, बाळू सोनवणे, प्रकाश सोनवणे, विश्वास खरात, यश जोशी, प्रकाश तायडे, नरेंद्र आव्हाड, भगवान निरभवणे, गोरखनाथ सुरवाडे, आकाश ढिवरे, दिलीप मोरे यांच्यासह आदी उपस्थितीत होते.