लष्कराच्या अग्निवीर परिक्षेचा निकाल जाहीर

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लष्कराच्या अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल लष्कराच्या Joinindianarmy.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांचा निकाल या संकेत स्थळवर पाहता येणार आहे. भारतीय लष्कराने अग्निवीर भरती योजने अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली होती. या साठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसर वाईज सीईईचा निकाल जॉइन इंडियन आर्मी वेबसाइटवर प्रसिद्ध झाला आहे. उमेदवार त्यांच्या झोन आणि पोस्टच्या लिंकवर क्लिक करून त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत.

यशस्वी उमेदवारांचे रोल नंबर पीडीएफ फाइलमध्ये दिले आहेत. सध्या, अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर ऑफिस असिस्टंट आणि नर्सिंग असिस्टंट या पदांसाठी जयपूर, अलवर, जोधपूर, झुंझुनू, राजस्थानचे कोटा आणि एमपीचे जबलपूर भोपाळ, रायपूर एआरओ यासह विविध एआरओ अंतर्गत जाहीर करण्यात आले आहेत. हळुहळू इतर राज्यांतील एआरओ पदांचे निकालही या दिवसांत जाहीर होतील.

अग्निवीर जीडी परीक्षा २२, २३, २४, २५ आणि २९ एप्रिल रोजी झाली. यानंतर अग्निवीर जनरल ड्युटी वुमन एमपी, अग्निवीर टेक, अग्निवीर ट्रेडसमन ८ वी आणि १० वी ची परीक्षा ३० एप्रिल रोजी घेण्यात आली होती. अग्निवीर कार्यालय सहाय्यक पदासाठी ३ मे २०२४ रोजी परीक्षा घेण्यात आली होती.

Protected Content