Home धर्म-समाज सावद्यातील ५ वर्षांच्या अरहानने आणि ११ वर्षांच्या फवादने आता पर्यंतचे पूर्ण केले...

सावद्यातील ५ वर्षांच्या अरहानने आणि ११ वर्षांच्या फवादने आता पर्यंतचे पूर्ण केले रमजानचे सर्व रोजे !


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पवित्र रमजान महिन्यात उपवास पाळणे हे श्रद्धा, संयम आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते. अशा या पवित्र काळात सावदा येथील दोन चिमुकल्यांनी आपल्या धार्मिक निष्ठेचा आदर्श घालून समाजाचे लक्ष वेधून घेतले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सावद्यातील अरहान खान (वय ५ वर्षे) या लहानग्याने यंदाच्या रमजान महिन्यात एकही दिवस न चुकवता आता पर्यंतचे सर्व रोजे पूर्ण करत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. एवढ्या लहान वयात इतका संयम, श्रद्धा आणि चिकाटी दाखवल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या संस्कारांमुळे आणि धार्मिक वातावरणामुळे अरहानने ही कामगिरी साध्य केल्याचे सांगितले जात आहे.

याचबरोबर फवाद खान (वय ११ वर्षे) यानेही सलग तिसऱ्या वर्षी रमजानमधील सर्व रोजे पूर्ण करून सातत्याचा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो नियमितपणे उपवास पाळत असून त्याच्या या दृढ निश्चयामुळे तो इतर मुलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

या दोन्ही मुलांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून सावदा शहरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लहान वयातच धार्मिक मूल्ये, शिस्त आणि संयम अंगीकारणाऱ्या या मुलांनी समाजासमोर एक सकारात्मक उदाहरण निर्माण केले आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात अशा प्रकारे श्रद्धा आणि संयमाचे दर्शन घडवणाऱ्या या चिमुकल्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या कार्यामुळे इतर मुलांनाही प्रेरणा मिळत आहे.


Protected Content

Play sound