जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनीजवळ इंस्टाग्रामवर बदनामी केल्याच्या कारणावरून एका प्रौढ व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. या संदर्भात बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील:
राकेश गणपत कंजरभाट (वय ४७, रा. कंजरवाडा हाउसिंग सोसायटी, जळगाव) हे आपल्या परिवारासोबत वास्तव्याला आहेत. मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता याच परिसरात राहणारे सुरेश सिद्धराम भाट, रोहित भाट, राज भाट आणि राहुल भाट हे चौघे जण राकेश कंजरभाट यांच्या घरी आले आणि त्यांना सांगितले की, तुमचा मुलगा इंस्टाग्रामवर त्यांची बदनामी करतो.
राकेश कंजरभाट यांनी त्यांना सांगितले की, यात माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही. असे सांगितल्याचा राग आल्याने चौघांनी राकेश कंजरभाट यांना शिवीगाळ करत डोक्याला गंभीर दुखापत केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात राकेश यांनी बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे सुरेश सिद्धराम भाट, रोहित भाट, राज भाट आणि राहुल भाट (सर्व रा. कंजरवाडा, जळगाव) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजीव मोरे करीत आहेत.