तहसीलदार श्वेता संचेतींचा मनमानी कारभार : शेतकऱ्यांतर्फे आत्मदहनाचा इशारा

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांच्या मनमानीविरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांनी दोनवेळा आंदोलन केले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. या मनमानी कारभाराला कंटाळून तालुक्यातील नायगाव शिवारातील शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

मुक्ताईनगर च्या तहसीलदार स्वेता संचेती यांच्या मनमानी कारभाराला तालुक्यातील अनेक शेतकरी कंटाळले आहेत, तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना गाराने घातल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांसह तहसीलदाराच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या वेळी देखील नायगावच्या शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. तहसीलदारांनी चार दिवसांमध्ये त्यांच्या प्रश्न सोडविला जाईल असे सांगितले होते, परंतु पंधरा दिवस होऊनही नायगाव येथील शेतकऱ्यांच्या प्रश्न सुटला नाही, म्हणून शेतकऱ्यांनी आता कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

नायगाव येथील शेतकरी संतोष पोहेकर यांच्या शेजारील शेतकऱ्यांनी त्यांचा रस्ता आडवला आहे ,शेतात पिकलेले गहू आणि मका रस्ता अडवल्यामुळे तसेच शेतात कडून आहे. रस्ता मिळावा म्हणून तहसीलदारांकडे वारंवार अर्ज करून विनंती करूनही एका वर्षापासून तहसीलदार श्वेता संचेती या तिकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे शेतात असलेल्या मका आणि गहू काळा पळून गेला आहे. शेतात पडलेले मका निम्म्याच्या वर रानडुकरांनी खाल्ली आहे ,त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास तहसीलदार यांच्या मनमानी कारभारामुळे नासाडी होऊन झाली आहे. पावसाळा तोंडावर आहे त्याआधी शेतीची मशागत करावी लागणार आहे. शेतात जायला रस्ता नसल्यामुळे शेतीची मशागत करणे देखील या शेतकऱ्याला अवघड झाले आहे. चार दिवसाच्या आत आमचा प्रश्न नाही सोडला तर आम्ही तहसील कार्यालयासमोर कुटुंबासहित आत्मदहन करू असा इशारा शेतकरी संतोष पोहेकर यांनी दिला आहे.

 

Protected Content