बोदवड लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बोदवड तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी नसल्या कारणामुळे येथील कर्मचारी हे आपल्या मनमानी कारभार करत असून त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच येथील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी आणि होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात अशी मागणी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केले जात आहे.
बोदवड तालुक्याला प्रभारी तालुका कृषी अधिकारी असल्याने शेतकऱ्यांचे काम वेळेवर होत नाही. दुसरीकडे बोदवड तालुका कृषी कार्यालयात बायोमेट्रिक मशीन नसल्याने कृषी विभागातील कर्मचारी हे आपल्या मनमानी कारभार आमच्या पद्धतीने केव्हाही येऊन हजेरी लावली जाते. त्यांच्यावर कुठलाही धाक नसल्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. शेतकरी हे आपल्या अडचणी सोडवण्यासाठी कामधंदे सोडून कार्यालयात येतात परंतु त्यांचे काम होत नसल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळते तसेच उत्तरे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे
कृषी विभाग ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विभाग असून या कार्यालयात कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रिक हजेरी बसवण्यात यावी.
बोदवड तालुक्याचा कारभार प्रभारी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे असल्याने ते तर डोळ्यांनीही कार्यालयात दिसत नाही. तालुका कृषी कार्यालयात खालीलपदे रिक्त आहेत. तालुका कृषी अधिकारी (१)एक कृषी अधिकारी ऑफिस (१)एक मंडळ अधिकारी (१)एक कृषी सहाय्यक(४) चार कृषी पर्यवेक्षक ऑफिस(१) एक शिपाई एक चालक (१)एक असे एकूण १० पदे रिक्त असल्यामुळे हे कार्यालय रामभरोसे असल्याने जिल्हा कृषी अधिकारी तडवी साहेब यांनी या कडे लक्ष द्यावे अशी शेतकरी वर्गाकडून मागणी केली जात आहे .