यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील भालशिव ग्राम पचायत अंतर्गत टेंभीकुरण या गांवात आजही फक्त अनुसुचित जाती / जमातीचे लोक राहत असुन त्यांना शासनाने कुठल्याही मुलभुत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत तसेच त्या गावाचे ग्रामसेवक दलित आदिवासींना कुठल्याही प्रकारचे दाखले अथवा प्रस्ताव देत नाहीत तसेच यापूर्वी आमच्याकडून प्रत्येक वर्षाला तत्कालीन ग्रामसेवक आमच्याकडून ग्रामपंचायत कर वसुल करित होते.
परंतु द्वेषभावनेने प्रेरित झालेल्या विद्यमान ग्रामसेवक जाणिवपुर्वक दलित आदिवासींना आपल्या मुलभुत हक्कापासुन वंचित ठेवले आहे. त्या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून अनेक वेळेस आंदोलन केले लेखी स्वरूपात निवेदण दिले परंतु जाणीवपुर्वक टेंभीकरण गांवातील दलित आदिवासी समाजाच्या समस्या कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे तसेच दहिगाव सावखेडे येथील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकरणात झालेल्या अनियमितता व गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी व दोषी व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
या मागणीकडे जाणिव पुर्वक यावल पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष करण्यात आले असल्याच्या त्याअनुषंगाने निळे निशाण संघटनेच्या वतीने दि . ०३ ऑक्टोबर २०२४ पासुन पंचायत समिती कार्यालय यावल येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरूवात करण्यात आलेली आहे. तरी आम्हाला दोन दिवसात समाधान कारक उत्तर न मिळाल्यास दि . ०५ ऑक्टोबर २०२४ पासून ठिय्या आंदोलनाचे रूपांतर आमरण उपोषणात करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी संघटनेचे अनेक महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.